Allotment of school accessories to needy students in sonar a

सोनार समाजातील गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहीत्याचे वाटप.*

( तसेच इयत्ता 10वी 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार )

*सेवा_नरहरींची* या उपक्रामांतर्गत मागील 2 वर्षापासून सोनार समाजातील गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेयसाहीत्याचे दप्तर, डबा,पाणी बोटल, वही,पेन, पेन्सिल, कंपास, रंग खडू, रजिस्टर, चित्रकला वही आदी शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले, परसावत नगर परभणी येथील श्री छ्त्रपती शाहू महाराज विद्यालय येथे कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रास्तावीक प्रमोद शहाणे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिक्षक संघ अध्यक्ष डॉ.अनिल मैड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून,जेष्ठ समाज सेवक इंजि. गोविंदराव अंबिलवादे , संजय डहाळे वझुरकर,दिपक टाक, सचिन दहिवाळ, अतुल काटकर, आदींची उपस्थिती होती. वरील मान्यवरांनी आपले विचार मांडताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
समाजातील मुलगी शिकली म्हणजे कुटुंब शिकले, उच्च शिक्षीत मुलींना त्यांच्या योग्यते प्रमाणे उपवर मिळू शकतो, चांगल्या कुटुंबात त्यांचा विवाह होईल व पुढील जीवन सुखकर होईल, हा उद्देश समोर ठेवून, समाजातील गरजूवंत विद्यार्थ्यांनींना संपुर्ण शालेय साहीत्याचे वाटप करण्यात आले. तसेच *गुणवंत विद्यार्थी कु. अनुष्का अरविंद शहाणे इयत्ता 10वी 95%, कु. कोमल बंडु डहाळे इयत्ता 12वी 92%, कु. दिव्या दिपकराव टाक इयत्ता 12वी 92%, कु. संस्कृती महेश टेहरे 10 वी 90%, कु.अंकिता उमेश शहाणे इयत्ता 10वी 87%, कु.ईशिका सुनील शहाणे इयत्ता 12 वी 88% चि.संदीप गजानन लोलगे इयत्ता 10वी 83%, चि. सुबोध शिरीष कळमनरीकर इयत्ता 10वी 95% (cbsc) यांचा सेवा नरहरीची यांच्या वतीने सन्मान पत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला..* या प्रसंगी सोनार समाजाचे मा.अध्यक्ष संतोष ज्ञा. शहाणे, सराफ व सुवर्णकार असो. जिल्हा संघटक अमोल कुलथे (पांगरकर), दैवज्ञ सोनार समाज अध्यक्ष बाळासाहेब रोडे, अतुल काटकर, बाळासाहेब डहाळे, संजय बोकण, गणेश जडे, विश्वाजीत काटकर, हनुमान मंडलिक, अमोल टेहरे, राम कुलथे, कैलास शहाणे,सचिन शहाणे, दत्ता डहाळे, अमोल शहाणे,संदीप कुलथे पांगरकर, गोपाळराव कुलथे,कैलास टेहरे,लक्ष्मीकांत अष्टेकर,महेश टेहरे, कृष्णा कुलथे, अरविंद शहाणे, प्रमोद डहाळे, सौ.स्नेहलताई टाक सौ.सुशीलाबाई पांगरकर, सौ.शुभांगीताई डहाळे, सौ.स्नेहाताई पांगरकर, सौ. ज्योतीताई कुलथे आदी, विद्यार्थी तथा पालक व समाजातील बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थीत होते..

62633461_2092538527538345_7344354485151465472_o.jpg

Author: Santosh Shahane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *