Lad Sonar Samaj Sanstha Triambekshwar

*संत शिरोमणी नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था , त्रिम्बकेश्वर* ची मिटिंग आज *मा,. दिलीपशेठ शहाणे* यांचे अध्यक्षतेखाली पार पडली .
विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली .
ऐतिहासिक होणाऱ्या *लाड सोनार महाअधिवेशन* ला सर्वतोपरी सहकार्य करत हे अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित असलेल्या सर्व बंधु भगिनींनी केला .
संस्थेच्या वतीने वधुवर परिचय मेळाव्याविषयी चर्चा झाली , ऑगस्ट महिन्यात पंढरपुर येथील हरिहर साक्षात्कार सोहळा तसेच लाड सोनार वधु वर परिचय मेळावा पूर्वनियोजित असल्यामुळे तसेच लाड सोनार महाअधिवेशन हे दोन मोठे कार्यक्रम असल्यामुळे संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वधुवर परिचय मेळाव्याबाबतची चर्चा पुढील मिटिंगमध्ये घेण्यात यावी अशी सूचना उपस्थितांनी मांडली .
संस्थेचे अध्यक्ष दिलीपशेठ शहाणे , प्रकाशशेठ कुलथे , सुभाषशेठ शहाणे ,सुनीलभाऊ माळवे ,ऍड.बोराडे , मनोजजी कपोते यांचेसह सर्वश्री नंदु चिंतामणी , सुनील काजळे , गोपाळ कुलथे , राजेंद्रशेठ कुलथे , राजेंद्र कपोते , सौ गीताताई नवसे , संजुभाऊ उदावंत , सेलूकर , योगेशजी नागरे , श्री कपोते , नागरे गुरुजी , प्रदीप कपोते गंगाधरजी शेवंते यांचेसह अनेक बंधु भगिनी यावेळी उपस्थित होते .

IMG-20190609-WA0015.jpg

Author: Dilip Shahane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *