Drawing Competition Shri Dnyaneshwar Seva Pratisthan Dombivali

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सेवा प्रतिष्ठान, डोंबिवली

जाहीर करत आहोत….

ज्ञानेश्वरी ग्रंथात दिलेल्या
व्यवहारातील साध्या, सोप्या उदाहरणांनी
जीवनमूल्यांना जिवंत करणारी…
चित्रकला स्पर्धा
गट क्र. १ इयत्ता. ५ वी-६ वी
गट क्र. २ इयत्ता. ७ वी-८ वी
गट क्र. ३ इयत्ता ९ वी-१० वी
गट क्र. ४ खुला गट

आकर्षक बक्षिसे

प्रत्येक गटाला ज्ञानेश्वरीतील ओवी व त्या ओवीत सांगितला गेलेल्या संदेश-मूल्य यांचा सारांश दिलेला असेल.
स्पर्धकाने स्वत:चे कौशल्य व कल्पनाशक्ती वापरून त्यावरील चित्र तयार करायचे आहे.
नमुना विषय – सांग पां सर्पफणीचा साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ? ।। ११७ ।। ज्ञानेश्वरी अ.५ वा ।।

अर्थ – सर्पाच्या फण्याची सावली आहे, ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे ?

सारांश – अयोग्य संगत ही अत्यंत भयंकर गोष्ट आहे. त्यापासून सावध राहायला हवे. कारण त्याने आयुष्यात दुःख,
मन:स्ताप आणि भयंकर हानीच वाट्याला येतात.

चित्र कसे काढाल – सर्वत्र फक्त बारीक गवत आणि वर तळपणारा मार्तंड (सूर्य). आजूबाजूला लांब अंतरावर कोणतीच झाडे वा
झुडपे नाहीत. एके ठिकाणी मोठा नाग वेटोळे घालून आणि फणा पसरून गवतात बसला आहे. अनेक उंदिर अन्नाच्या शोधात
फिरत आहेत. त्यातील एक उन्हाने हैराण झाला आहे. मान खाली घालून अन्न हुंगणा-या उंदराला लांबवर एक सावली दिसते.
त्याने कशाची सावली आहे, ते बघायचेही कष्ट घेतले नाही. तो त्या सावलीत आला आणि …..

IMG-20190603-WA0000.jpg

Author: Aniruddha Ranalkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *