कारागीर बांधवाना स्मार्ट कार्ड

जडिया भवन येथे हस्तशिल्प औरंगाबाद विभागातील साहु सर व नेने सर यांनी उपस्थितीती देऊन आपल्या सुवर्णकार समाज कारागीर बांधवाना स्मार्ट कार्ड संबधित माहिती देऊन त्यांना गर्व्हमेंट च्या विविध योजना इन्शुरन्स विना तारण कर्ज व पेन्शन योजना बद्दल अनेक माहिती दिली त्या प्रसंगी जळगाव सराफ बाजारातील प्रसिद्ध व्यापारी श्री किरणशेठ पातोंडेकर आणि सुधाकर भाऊ दंडगव्हाळ ; श्री सुनील भाऊ सोनार ; श्री संजय भाऊ भामरे ; यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड 100 कारागिरांना वितरित करण्यात आले.
या ठिकाणी सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार कारागीर संस्थेचे मा. श्री किरण भाऊ पातोंडेकर यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी श्री राहुल विसपुते, श्री प्रदीप भाऊ सोनार , हरिष जगताप , सागर दुसाने , श्री प्रमोदशेठ विसपुते आदींनी परिश्रम घेतले तसेच
श्री शंकर भाऊ आहिरराव , भावेश दंडगव्हाळ , श्री मुन्ना जगताप , श्री देविदास सोनार , श्री लक्ष्मीकांत उमरानेकर , यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *