कामगार दिन साजरा

कामगार दिन साजरा
(जेष्ठ कारागीर बांधवांचा सत्कार,जिवन सुरक्षा विमा नोंदणी)

कामगार दिना निमित्य सोनार समाजातील जेष्ठ कारागीरांचा सत्कार…
सेवा नरहरींची या उपक्रमांतर्गत कामगार दिन साजरा करण्यात आला, पांगारकर हॉल गांधी पार्क येथे आयोजीत कार्यक्रमात प्रथमता संत श्री नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून *सोनार समाजातील जेष्ठ गुणवंत कारागीर बालाजी टाक, ज्ञानेश्वर बोकण, बालाजी बोकण, गोपाळ टाक, बबन टाक आदी कारागीरांचा शाल श्रीफळ, पुष्पहार व सन्मान पत्र देवून कर सल्लागार अभीजीत पर्वतकर सर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.*
उपस्थीत कारागीरांचा *सेवा नरहरींची या उपक्रमांतर्गत प्रत्येकी दोन लाख रूपयांचा PMSBY या योजनेअंतर्गत निशुल्क विमा काढून नाव नोंदणी करण्यात आली,* तसेच बाजार पेठ पासून दुरून येणे जाणे करणार्या कारागीर बांधवांना मान्यवरांच्या हस्ते भेट स्वरुपात बूट वाटप करण्यात आले. *कारागीर हाच समाजाचे नाव व समाजाचा परांपरात कलेचा वारसा पुढे चालवणारा मुख्य आधार स्तंभ आहे, ज्यांच्या उत्कृष्ट कलेमुळेच समाजाचे नाव लौकिक व परंपरागत कला कौशल्य पुढील पिढीस पहावयास मिळते.* असे समाजाचे आदर्श जेष्ठ कारागीर यांचा या उपक्रमाद्वारे सत्कार व गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल मैड यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पुणे येथील कर सल्लागार अभिजीत पर्वतकर हे उपस्थीत होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी टाक, ज्ञानेश्वर बोकण, बालाजी बोकण, गोपाळ टाक, बबन टाक हे उपस्थीत होते. तर कार्यक्रम यशस्वीते करिता सोनार समाजाचे माजी अध्यक्ष संतोष ज्ञा. शहाणे, सराफ असोसिएशन जिल्हा संघटक अमोल पांगरकर, बाळासाहेब डहाळे, गणेश जडे, अमोल टेहरे, संजय बोकण, कैलास टेहरे , अमोल शहाणे, हनुमान मुंडीक, दत्ता डहाळे, तानाजी शहाणे, कैलास शहाणे, अतुल काटकर, सचिन शहाणे, मधुकर टाक, विजयकुमार डहाळे आदीनी परिश्रम घेतेले. यावेळी बाजारपेठेतील सुवर्णकार कारागीर बांधव बहू संखेने उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *