Welcome

वैभवी शहाणेचा सोनार समाजाच्या वतीने सत्कार

Felicitated on the behalf of Vaibhavi Shahane’s sonar community

State Sports and Youth Services Directorate and District Sports Officer Office, Mumbai City, in the state-level inter school boxing championship of the Sonar community, Mahavavi Shahane secured the second position in the state of the state in the state of the stat of the state of the state of the state.

राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय अंतर शालेय बाॅक्सींग स्पर्धेत सोनार समाजाची वैभवी शहाणे हिने ६५ किलो वजन गटात बाॅक्सींग मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
यानिमित्ताने वैभवी हिचा सेवा नरहरींची उपक्रमाअंतर्गत सोनार समाजाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.अत्यंत मध्यम वर्गीय कुटुंबातुन असणाऱ्या वैभवी हिने आपले प्राविण्य बाॅक्सींग सारख्या असाधारण अशा खेळातुन दाखवत, परभणी जिल्ह्यासह सोनार समाजाचे नाव उंचावले आहे. अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वैभवी हिला पुढील स्पर्धांसाठी सुभेच्छा देत राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी सोनार समाजाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी वैभवीला सेवा नरहरींची या उपक्रमाअंतर्गत समाजाच्या वतीने देण्यात आले. 


या प्रसंगी सोनार समाजाचे माजी अध्यक्ष संतोष शहाणे, स. सु.असो संघटक अमोल पांगरकर, संजय बोकण, अमोल शहाणे, हनुमान मुंडलीक, गणेश जडे, सचिन शहाणे, प्रमोद शहाणे, अमोल टेहरे, गजानन शहाणे, बाळासाहेब डहाळे, नामदेव शहाणे, कैलास शहाणे, आदी समाज बांधव उपस्थित होते.

On this occasion Sonar Samaj’s former President Santosh Shahane, S. Such organizer Amol Pangarkar, Sanjay Bokan, Amol Shahane, Hanuman Mundale, Ganesh Jade, Sachin Shahane, Pramod Shahane, Amol Terhe, Gajanan Shahane, Balasaheb Dahale, Namdev Shahane, Kailas Shahane and others were present.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *